सलाम-ए-इश्क ज्याला सलाम-ए-इश्क: अ ट्रिब्यूट टू लव्ह म्हणूनही ओळखले जाते, हा २००७ मध्ये निखिल अडवाणी दिग्दर्शित केलेला एक भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे, जो कल हो ना हो (२००३) नंतर त्यांचा दुसरा दिग्दर्शनात्मक चित्रपट आहे. लव्ह ॲक्च्युअली (२००३) ह्या हॉलीवूडच्या चित्रपटाचा हा अनधिकृत रिमेक आहे व यात अनिल कपूर, गोविंदा, सलमान खान, जुही चावला, अक्षय खन्ना, जॉन अब्राहम, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आयेशा टाकिया, शॅनन एसरा, सोहेल खान आणि ईशा कोप्पीकर यांचा समावेश आहे. यात सहा प्रेमकथा एकत्र विणल्या आहे.
चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण २००४ मध्ये सुरू झाले आणि २००६ मध्ये संपले. छायांकन पियुष शाह यांनी केले आहे. संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिले आहे, तर गीते समीर यांनी लिहिली आहेत.
हा चित्रपट २५ जानेवारी २००७ रोजी प्रदर्शित झाला आणि डिजिटल पद्धतीने प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटाला मिश्रित प्रतिक्रिया मिळाल्या, विशेषतः जॉन, विद्या आणि अक्षय यांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली, परंतु त्याच्या लांबीबद्दल टीका झाली. चित्रपटाने ५२.२४ कोटी कमावले.
सलाम-ए-इश्क
यामागील विज्ञान आणि इतिहास.