इचितोमिया हिरोहितो (१९०१ - १९८९) हे जपानच्या पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत.
जपानी राजकुमारांची परंपरा मोडून हिरोहितो यांनी नागाकोवुनी या युवतीशी प्रेमविवाह केला. हिरोहितो यांनी सम्राट पद घेतले तेव्हा जपान अशांत होता, राजकीय खून, मारामाऱ्या यांना ऊत आलेला होता. हिरोहितो यांना शोवा हे नाव धारण केले. याचा अर्थ ज्ञानपिपासू, शांतता असा होतो. शांतताप्रेमी लोकांनाही आपल्या सम्राटाच्या शांततेच्या मार्गावर विश्वास होता.
दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभव झाला. सम्राट हिरोहितो यांनी २६ शतकांची परंपरा मोडून थेट सामान्य माणसाशी संवाद साधला, जनतेला उद्देशून सार्वजनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी कुठेही पराभवाचा, शरणागतीचा उल्लेख केला नाही. जपानची लष्करी महासत्ता अशी ओळख पुसून लोकशाही पद्धतीने, सगळ्यांच्या सहभागाने देश पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जपानचा विकास आरखडाही तयार करण्यात आला.
सम्राट शोवा
या विषयातील रहस्ये उलगडा.