इराण

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इराण

इराण (अधिकृत नाव: इराणचे इस्लामी प्रजासत्ताक) हा पश्चिम आशिया आणि मध्यपूर्वेतील एक प्रमुख देश आहे. १,६४८,१९५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा देश मध्यपूर्वेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जगातील १८ वा सर्वात मोठा देश आहे. ८ कोटी ६० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला इराण हा जगातील १७ वा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. देशाची अधिकृत भाषा फारसी असून तेहरान ही देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मशहद, इस्फहान, कराज आणि शिराज ही इराणमधील इतर प्रमुख शहरे आहेत. प्रशासकीय दृष्टीने इराण ३१ प्रांतांमध्ये विभागलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →