फारसी व पार्शी ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा इराण मध्ये बोलली जाते. फारसी भाषा आधुनिक काळात इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान या देशांची ती अधिकृत भाषा आहे. आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, तुर्कस्तान, उझबेकिस्तान, इराक, पाकिस्तान या देशांतही फारसी जाणणारे लोक आहेत. भारतीय उपखंडात मध्ययुगीन इस्लामी राजवटींच्या काळात फारसीने राजभाषेचे महत्त्व कामवल्यामुळे अनेक भारतीय भाषांवर मध्ययुगीन काळापासून तिचा प्रभाव पडला. काश्मिरी, उर्दू याशिवाय हिंदी आणि मराठीत मूलतः फारसी असलेले अनेक शब्द आढळतात. अमीर खुस्रो, मिर्झा गालिब आणि इक्बाल इत्यादी भारतीय साहित्यात नावाजलेल्या कवींच्या रचना फारसीत आहेत.
अफगाणी दारी भाषा मंगोलियन सारख्या भाषांनी मोठ्या प्रमाणात मिसळली आहे.
फारसी भाषा
थोडक्यात पण महत्त्वाचे.