मध्य आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. इतर भौगोलिक प्रदेशांप्रमाणे मध्य आशियाच्या अनेक व्याख्या आहेत. सर्वसाधारणपणे मध्य आशियामध्ये आशियाच्या पश्चिम भागातील युरोपाच्या सीमेजवळील भूभागाचा समावेश केला जातो. ह्यांमध्ये भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेले कझाकस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश येतात. ह्या देशांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६.१५ कोटी इतकी आहे.
काही व्याख्यांनुसार दक्षिण आशियातील अफगाणिस्तान व इराण तर पूर्व आशियातील मंगोलिया हे देश तसेच पाकिस्तानचा उत्तर भाग, भारताचा काश्मीर, चीनमधील शिंच्यांग हा प्रदेश व दक्षिण सायबेरिया देखील मध्य आशियामध्ये गणले जातात.
मध्य आशिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.