इराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी ह्या गटामधील एक उप-भाषासमूह आहे. ह्या भाषासमूहामध्ये अंदाजे ८७ भाषा असून त्या प्रामुख्याने पश्चिम आशिया प्रदेशामध्ये वापरात आहेत. २००८ च्या अदाजानुसार १५-२० कोटी व्यक्ती या भाषासमूहातील भाषा बोलतात. पैकी अंदाजे ७.५ कोटी व्यक्ती फारसी, ५ कोटी पश्तो ३.२ कोटी कुर्दी तर २.५ कोटी व्यक्ती बलुची भाषा वापरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इराणी भाषासमूह
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!