तैशो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तैशो

सम्राट तैशो (जन्मनाव: योशिहितो; ३१ ऑगस्ट, १८७९ - २५ डिसेंबर, १९२६) हे जपानचे १२३वे सम्राट होते. यांचा सत्ताकाल १९१२ ते १९२६ दरम्यान होता. या काळात जपानमध्ये लोकशाहीची वाढ झाली. या दरम्यान जपानने पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. १९२३चा कांतोचा महाभूकंप आणि जपानमधील स्पॅनिश फ्लु महामारी या काळातील इतर महत्वाच्या घटना होत्या.



सम्राट मेईजी आणि त्यांची उपपत्नी यानागिवारा नारुको यांच्या पोटी जन्मलेल्या योशिहितो यांना १८८८ मध्ये युवराज आणि वारस म्हणून घोषित करण्यात आले, त्यांच्या दोन मोठ्या भावंडांचे बालपणातच निधन झाले. हे लहानपणीच मेनिंजायटिससह अनेक आजारांनी ग्रस्त होते. १९०० मध्ये त्यांनी फुजिवारा कुळातील कुजो घराण्यातील सदाको कुजोशी लग्न केले. या जोडप्याला चार मुले झाली. १९१२ मध्ये योशिहितो त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सम्राट बनले. मेंदूच्या आजारांनी ग्रस्त तैशोनी राजकारणात मर्यादित भूमिका बजावली. १९१९ पासून त्यांनी कोणतीही अधिकृत कर्तव्ये पार पाडली नाहीत. त्यांच्या ढासळत्या आरोग्यामुळे १९२१ मध्ये त्यांचा मोठा मुलगा, युवराज हिरोहितो यांनी सत्ता सांभाळली. १९२६ मध्ये तैशोचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यानंतर सम्राट झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →