समंथा रुथ प्रभू

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

समंथा रुथ प्रभू

समंथा रुथ प्रभू (पूर्वीचे अक्किनेनी; जन्म २८ एप्रिल १९८७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले आहे. चार फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, सहा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन CineMAA पुरस्कारांसह तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अभिनयासोबतच ती अनेक ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी चेहरा आहे. तसेच तिने २०१२ मध्ये महिला आणि मुलांना वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी प्रत्युषा सपोर्ट ही स्वतःची एनजीओ देखील सुरू केली. फाऊंडेशनला सहाय्य देण्यासाठी ती जाहिराती, उत्पादन लॉन्च आणि उद्घाटन कार्यक्रमांमधून मिळालेली कमाई दान करते. तिने स्वतःच्या मालकीचा साकी नावाचा महिलांच्या कपड्यांचा ब्रँड स्थापन केला. समंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →