श्रेया घोषाल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

श्रेया घोषाल

श्रेया घोषाल (जन्म : मार्च १२, १९८४) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहे. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम , तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.

श्रेयाने सा रे ग म प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकीर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले. तेव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →