ज्योतिका

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ज्योतिका

ज्योतिका सदाना-सर्वणन (१८ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे जी प्रामुख्याने तमिळ चित्रपटांत काम करते. याव्यतिरिक्त तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील ती काम करते. ज्योतिकाला एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , चार फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, तीन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि कलईमामणी पुरस्कार प्राप्त आहत. तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखले जाते, आणि मीडियाद्वारे दक्षिण भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये एक म्हणून तिने स्थान मिळवले आहे.

प्रियदर्शन दिग्दर्शित डोली सजा के रखना (१९९७) या हिंदी चित्रपटातून ज्योतिकाने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला तमिळ चित्रपट वाली (१९९९) होता. टागोर (२००३) या आपल्या पहिल्या तेलगू चित्रपटात तिने चिरंजीवीसोबत काम केले. ज्योतिकाला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार वाली (१९९९) साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण - दक्षिणेसाठी मिळाला. कुशी (२०००) साठी तिला फिल्मफेर सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कुशी (२०००), डम्म डम्म डम्म (२००१), पूवेल्लम उन वासम (२००१), काखा काखा (२००४), पेराझगन (२००४), चंद्रमुखी (२००५) आणि मोझी (२००७) हे तिचे यशस्वी चित्रपट आहेत. यापैकी नंतरच्या तीन चित्रपटांसाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला. मोझी या चित्रपटासाठी ज्योतिका उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी अंतिम तीनमध्ये होती, मात्र गुलाबी टॉकीज या कन्नड चित्रपटासाठी तिने उमाश्रीकडून पुरस्कार गमावला. साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीसाठी सर्वाधिक १६ नामांकने मिळवण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

तमिळ अभिनेता सुरियाशी अनेक वर्षे असलेल्या नातेसंबंधानंतर ज्योतिकाने ११ सप्टेंबर २००६ रोजी केले आणि कारकिर्दीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली. तिने ३६ वयधिनीले (२०१५) या चित्रपटात पुनरागमन केले जेथे तिच्या अभिनयाला जोरदार प्रशंसा मिळाली आणि तिला चित्रपटासाठी दक्षिणेकडील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार मिळाला. ३६ वयधिनीलेच्या यशानंतर, ती मगलीर मट्टुम (२०१७), नाचियार (२०१८), कॅटरिन मोझी (२०१८), रातचासी (२०१९) आणि पोनमगल वंधल (२०२०) सारख्या महिला केंद्रित चित्रपटांच्या मालिकेत दिसली आणि मणिरत्नमच्या मल्टीस्टारर चेक्का चिवंथा वानम (२०१८) मध्ये देखील तिने मुख्य स्त्री भूमिका केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →