सुश्मिता सेन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुश्मिता सेन

सुश्मिता सेन (मराठी लेखनभेद: सुष्मिता सेन ; बंगाली: সুস্মিতা সেন ; रोमन लिपी: Sushmita Sen ;) (नोव्हेंबर १९ इ.स. १९७५; हैदराबाद, आंध्र प्रदेश - हयात) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने हिंदी भाषेतील चित्रपटांत अभिनय केला आहे. इ.स. १९९४ सालातल्या मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' उर्फ "विश्वसुंदरी" किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली.

१९९६ मध्ये पडद्यावर झळकलेल्या दस्तक या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही तमिळ व इंग्रजी भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.

विनोदी चित्रपट बीवी नंबर १ (1999) मधील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि सिर्फ तुम (1999) आणि फिल्हाल... (2002) यांच्यातील तिच्या भूमिकांसाठी देखील तिला नामांकन मिळाले. तिच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये आँखे (2002), मैं हूँ ना (2004), मैने प्यार क्यूं किया? (2005) यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →