सचिन पिळगांवकर (१७ ऑगस्ट १९५७; बृहन्मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते आहेत. त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे.
इ.स. १९६२ सालच्या "हा माझा मार्ग एकला" या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. बालकलाकार म्हणून त्यांनी सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले. गीत गाता चल (1975), बालिका बधू (1976), आंखियों के झारोखों से (1978) आणि नदिया के पार (1982) हे अत्यंत यशस्वी चित्रपट करून ते अभिनेता म्हणून भारतातील घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमात काम केले आहे. तू तू मैं मैं (2000) आणि कडवी खट्टी मिठी यशस्वी विनोदी मालिकांमध्ये अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी मैं बाप (1982), नवरी मिळे नवऱ्याला (1984), अशी ही बनवा बनवी (1988), आमच्यासारखे आम्हीच (1990) आणि नवरा माझा नवसाचा (2004) यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
सचिन पिळगांवकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.