रीमा लागू (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (२१ जून १९५८ - १८ मे, २०१७) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन..!, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रीमा लागू
या विषयातील रहस्ये उलगडा.