हरिहरन अय्यर (जन्म : ३ एप्रिल, १९५५) हे एक हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. हरिहरन यांनी मुंबईत राहून विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. २००४ साली हरिहरनला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
हरिहरनने लेस्ली लुईस ह्या भारतीय पॉप गायकासोबत कॉलोनियल कझिन्स ह्या नावाने देखील अनेक गाणी म्हटली आहेत.
हरिहरन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?