अजित वाच्छानी (१९५१ - २५ ऑगस्ट २००३) हे एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते होते. मिस्टर इंडिया (1987) ("तेजा" म्हणून), मैने प्यार किया (1989), कभी हा कभी ना (1993), हम आपके है कौन, (1994) तसेच हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले होते. (1994) आणि हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ हैं' हे त्याचे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि कमाई करणारे चित्रपट आहेत. त्यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट 'एक पेक्षा एक' याशिवाय तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 'हसरते', 'दाने अनार के' आणि 'एक महाल हो सपनो का' आदी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांत देखील काम केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अजित वाच्छानी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.