साई पल्लवी सेंथामराय (जन्म:९ मे, १९९२) ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे जी तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करते. प्रेमम (२०१५) आणि फिदा (२०१७) या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
पल्लवी शिक्षणाने डॉक्टर आहे, तिने २०१६ मध्ये एमबीबीएस (वैद्यकीय पदवी) पूर्ण केली आहे. इस २०१५ मधील मल्याळम चित्रपट प्रेमम मधील मलारच्या भूमिकेसाठी ती पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने काली (२०१६) चित्रपटात काम केले. तिने रोमँटिक चित्रपट फिदा (२०१७) मध्ये भानुमतीची भूमिका साकारून तेलगूमध्ये पदार्पण केले आणि दिया (२०१७) चित्रपटातुन तिने तमिळ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. इस २०२० मध्ये फोर्ब्स मासिकाने भारताच्या ३० वर्षांखालील ३० व्यक्तीपैकी एक म्हणून तिची नोंद केली.
सई पल्लवी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?