पूजा हेगडे (जन्म:१३ ऑक्टोबर, १९९०:मुंबई, महाराष्ट्र - ) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ही हिंदी, तमिळ चित्रपटांसह प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये दिसते. हेगडे मिस युनिव्हर्स इंडिया २०१० स्पर्धेत उपविजेती होती. मुगामूदी (२०१२) या तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने ओका लैला कोसम (२०१४) मधून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि मोहेंजो दारो (२०१६) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर हेगडे यांनी दुव्वाद जगन्नाधाम (२०१७), अरविंदा समेथा वीरा राघव (२०१८), महर्षी (२०१९), हाऊसफुल ४ (२०१९), आला वैकुंठपुरमलो (२०२०) आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर (२०२१) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. हेगडे SIIMA पुरस्काराची विजेती आहे.
हेगडे ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हेगडे २०२१ सालासाठी दक्षिण चित्रपटसृष्टीतील फोर्ब्स इंडियाच्या इंस्टाग्रामवरील सर्वात प्रभावशाली स्टार्समध्ये ७व्या स्थानावर आहेत.२०२२ मध्ये हेगडेचे राधे श्याम आणि आचार्य हे चित्रपट सपशेल फसले.
पूजा हेगडे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.