संभाजी व्यंकटराव पाटील यांचा जन्म ११ जानेवारी १९७४ मध्ये सुगांव ता.मुखेड,जि. नांदेड येथे झाला. ते सद्या राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर येथे मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांनी एम.ए. (मराठी), केल्यानंतर पीएच.डी. पदवीसाठी डॉ.केशव तुपे यांच्या मार्गदर्शनाने राजन गवस यांच्या समग्र साहित्यातुन व्यक्त झालेल्या भूमिनिष्ठ जीवनजाणिवांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद कडे प्रबंधसादर केला.
त्यांनी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना येथे २००१ ते २००९, मराठी विभागप्रमुख म्हणुन काम केले. २००९ पासून राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर येथे मराठी विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणुन रुजू झाले. २०१५ पासून सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन, सद्या प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन काम करत आहेत.
संभाजी पाटील
थोडक्यात पण महत्त्वाचे.