वामन लक्ष्मण कुलकर्णी (१९११ - ) हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे आहेत.
कुलकर्णी यांचा जन्म पूर्वीच्या खानदेश जिल्ह्यातील चोपडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्य (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्सन हायस्कूल, मुंबई Archived 2018-03-16 at the वेबॅक मशीन. येथे शिक्षकी पेशा केल्यानंतर विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य. नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत झाले. येथे त्यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्यानंतर १९७४ ते १९७६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख अध्ययन-अध्यापनाचे कार्य व १९७६ मध्ये निवृत्त.
वामन लक्ष्मण कुलकर्णी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.