पी. विठ्ठल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डॉ. पी. विठ्ठल ( जन्म : १ जून १९७५) (शिक्षण: एम.ए., नेट, पीएच.डी.) हे नांदेड विद्यापीठातील भाषा संकुलात मराठीचे विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे माजी संचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन न व अभ्यास केंद्राचे प्रमुखही आहेत. नांदेडला येण्यापूर्वी पी. विठ्ठल हे औरंगाबाद येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात १६ डिसेंबर २००४ ते २८ जानेवारी २००९ पर्यंत पूर्णवेळ व्याख्याता होते. त्याआधी २००१ पासून त्यांनी शिवछत्रपती महाविद्यालयात अध्यापन केले आहे.

नांदेड विद्यापीठात मराठी विषयात पीएच.डी. आणि एम.फिल. करणाऱ्यासाठी डाॅ. पी. विठ्ठल हे संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे, तर सहा विद्यार्थ्यांनी एम.फिल केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे आणि शासन व्यवहारकोश उपसमितीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत.

एकोणीसशे नव्वदनंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून पी. विठ्ठल यांची ओळख आहे. त्यांना बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार, अहमदनगर येथील संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार, अमरावती येथील स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कार. कोल्हापूर येथील धम्मपाल रत्नाकर पुरस्कार, महारष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, पुणे , मनोरमा साहित्य पुरस्कार, सोलापूर, विदर्भ साहित्य संघाचा कवी श्रीधर शनवारे काव्य पुरस्कार, जळगाव येथील स्व. गणेश चौधरी काव्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार, आपटे वाचन मंदिराचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →