संदीप खरे (जन्म : १३ मे १९७३) हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे 'दिवस असे की' आणि 'आयुष्यावर बोलू काही' हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्या कार्यक्रमाचे हजाराच्यावर प्रयोग झाले आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल असतात. आयुष्यावर बोलू काही बरोबरच, ते कवी वैभव जोशी ह्यांच्यासोबत 'इर्शाद' हा कवितांचा कार्यक्र देखील करतात. संदीप यांनी 'दमलेल्या बाबाची कहाणी' या मराठी चित्रपटात प्रमूख भूमिका केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संदीप खरे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.