सुधीर मोघे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सुधीर मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९ - पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ.स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते..

सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. स्वरानंदच्या सर्व कार्यक्रमांचेही ते अध्यक्ष असत. नाट्य‌अभिनेते श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.

मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे निवर्तले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →