संजय राणा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

संजय राणा

संजय राणा (५ मे, २००१:डब्रा, हिस्सार जिल्हा, हरयाणा, भारत - ) एक भारत कडून हॉकी खेळणारा खेळाडू. हा बचाव फळीतून खेळतो. हा २०२२ हांगझू आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये तो दुसऱ्या ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक होता. याने पॅरिस येथील २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाबरोबर कांस्यपदक जिंकले.

संजय मूळचा हरियाणातील हिसारजवळील डब्रा गावचा आहे. हा चंडीगढकडून मुलांच्या संघातून खेळला आणि नंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व केले. राणा २०११ ते २०१७ दरम्यान चंडीगढ हॉकी अकादमीचा विद्यार्धी होता. या चंडीगढ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →