संग्रहालय

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वास्तु, शिल्प वगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला संग्रहालय किंवा 'वस्तू संग्रहालय' म्हणतात.

संग्रहालय, कलादालन, या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणाऱ्यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याबरोबर संग्रह वा प्रदर्शन पहायला येणाऱ्या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्रहालयात ही मांडणी कायमची व रचनाबद्ध असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →