मध्यवर्ती संग्रहालय (नागपूर)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मध्यवर्ती संग्रहालय (नागपूर)

नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालयही आहे. मध्यवर्ती संग्रहालय हे नागपूर शहरातील प्रसिद्ध संग्रहालय असून मुख्य आकर्षणाचा विषय आहे. सन १८६३ मध्ये स्थापन झालेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे. त्याची गणना देशातील मोठ्या व जून्या संग्रहालयातही होते. यात डायनासोरचे जीवाश्म, नाणी, प्राचीन शिलालेख, शिल्पे, शस्त्रे, प्रति-ऐतिहासिक ते आधुनिक काळापर्यंतच्या आदिवासी कलाकृती यासारख्या महत्त्वाच्या कलाकृती आहेत. त्यात भारताच्या वेगवेगळ्या राज्यकालातील वेगवेगळी दालने आहेत.(गुप्त,मगध,मौर्य,वाकाटक,सातवाहन आदी). तसेच, यात पुरातत्त्व,पक्षीदालन,कला व उद्योग,चित्रकला,शस्त्रदालन आदी दालने पण आहेत. स्थानिक लोकं यास अजब बंगला' असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →