महर्षी दयानंद सरस्वती वस्तू संग्रहालय हे सोलापूर येथील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात आहे. या संग्रहालयाची स्थापना १२ जानेवारी २०१० मध्ये डॉ. सतीश कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले .
या वस्तुसंग्रहालयातील सर्व वस्तू मुर्ती,शिल्प, नाणी वीरगळ शस्त्रास्त्रे इत्यादींचा संग्रह इतिहास विभाग प्रमुख डॉ लता अकलूजकर प्रा. भा. इतिहास व संस्कृती विभाग प्रमुख प्रा. एम. एम. मस्के, प्रा. बी. आर. गायकवाड आणि डॉ. आर. एन. जाधव प्राचार्य डॉ श्रीनिवास वडगबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील विविध गावातून जमा करण्यात आल्या.
महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरण सन २०१९ मध्ये दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव श्री.महेशजी चोप्रा ,प्राचार्य डॉ .विजयकुमार उबाळे, विभाग प्रमुख डॉ आर.एन. जाधव यांच्यामार्गदर्शनाखालीकरण्यातआले.संग्रहालयाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी पुरातत्त्व आणि संग्रहालय विभाग, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ ,पुणे यांचे सहकार्य लाभले.
संग्रहालयामध्ये विविध गावांमधून दगडी शिल्प, मूर्ती, वीरगळ आणि शिलालेख आणण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवक श्री. सिद्राम बंडगर, श्री. रमेश निराळे, श्री. मारुती जाधव, श्री. मुरलीधर डोंबाळे, श्री. शिवराय हांडे, श्री. यादवराव होटकर आणि श्री. गुरुनाथ काळे यांचे सहकार्य लाभले.
महर्षी दयानंद सरस्वती वस्तू संग्रहालय
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.