संगमनेर नगरपालिका कला, दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बस्तीराम नारायणदास सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील महाविद्यालय आहे. राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समितीच्या (National Assessment and Accreditation Council) सप्टेंबर २०१६ साली झालेल्या पुनर्मूल्यांकनात या महाविद्यालयास 'अ +' श्रेणी मिळाली. सन २०२१ पासून महाविद्यालयास 'स्वायत्त' तेचा दर्जा मिळाला.
शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर या संस्थेचे हे महाविद्यालय "संगमनेर महाविद्यालय" या नावाने परिचित असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. हे महाविद्यालय, अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिले आणि जिल्ह्यातील दुसरे महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचे औपचारिक उद्घाटन तत्काlIन संरक्षणमंत्री आणि माजी मुख्य मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
संगमनेर महाविद्यालय
थोडक्यात पण महत्त्वाचे.