ओंकारनाथ दामोदर मालपाणी (२१ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - १० मार्च २००८ :संगमनेर) हे संगमनेर येथील अग्रगण्य उद्योजक होते.'मालपाणी ग्रुप' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या उद्योगसमूहाचे ते आधुनिक अध्वर्यू होते. भारतातील प्रसिद्ध गाय छाप जर्दाचे ते उत्पादक होते.गाय छाप जर्दा बरोबरच त्यांनी भारतीय बाजारपेठेत 'माउली' आणि 'बादशहा' या जर्द्याच्या नव्या उत्पादनाची भर टाकली. वडील दामोदर यांच्या आग्रहाखातर वैद्यकीय शिक्षण सोडून त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला तेंव्हा केवळ दोन पोती जर्द्याचे उत्पादन होते. विद्यमान काळात मालपाणी उद्योगसमूहाची उलाढाल एक हजार कोटींची झाली आहे.
तंबाखू व जर्दा व्यवसायाबरोबरच ते अनेक सामाजिक कार्ये आणि सार्वजनिक संस्थाशी संबंधित होते. उद्योगातून मिळणाऱ्या संपत्तीचा विनीयोग त्यांनी संगमनेरचे शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक जीवन समृद्ध करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते.
ओंकारनाथ मालपाणी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.