शंकरराव गंगाधर जोशी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शंकरराव गंगाधर जोशी (जन्म :१७ मे १८८७ संगमनेर, अहिल्यानगर, - १ सप्टेंबर १९६९ संगमनेर) हे संगमनेर येथील जुन्या पिढीतील बहुश्रुत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व द्रष्टे आणि निष्ठावंत देशभक्त होते. ते 'नाना' नावाने परिचित होते. केवळ त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते लोकमान्य टिळकांचे भक्त आणि अनुयायी होते. तत्कालिन प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि विद्यमान संगमनेर महाविद्यालयाचे मूळ प्रवर्तक आणि संस्थापक होते.

शंकरराव जोशी यांना संगमनेर शहर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण प्रसारक संस्था स्थापन करण्याच्या घटना समितीचे ते पहिले सभासद, नंतर शिक्षण प्रसारक संस्थेचे पहिले सचिव आणि नंतरचे उपाध्यक्ष होते.

स्वातंत्र्यपूर्वकाळात 'विद्यार्थी संसद' स्थापन करून त्याद्वारे विद्यार्थांना लोकशाहीचे भान देण्याचा आणि शिक्षकवर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शिक्षकांमध्ये राष्ट्र्भान जागे करण्यासाठी 'शिक्षक संघटना' स्थापन करण्याचा देशातील पहिला मान शंकरराव जोशी यांच्याकडे जातो. प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि संगमनेर महाविद्यालयाच्या रूपाने अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय उपक्रमांना त्यांनी चालना दिली. लेखन, चिंतन आणि चळवळी यांनी त्यांचे जीवन भारलेले होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते, लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि प्रखर राष्ट्रभक्त होते.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, म. गांधी, साने गुरुजी, पैसा फंडचे अध्यक्ष अंताजी दामोदर काळे यांच्या सभा संगमनेर येथे व्हाव्यात, राष्ट्रभक्तीविषयी लोकजागृती व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रके छापण्यातील आणि ते वाटण्यातील अडचणी ध्यानात येताच स्वतःचा छपखाना काढणारे ते अहमदनगर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रभक्त होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →