भास्करराव दुर्वे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

स्वातंत्र्य सैनिक, साथी भास्करराव दुर्वे नाना (जन्म: २९ एप्रिल १९२० संगमनेर, मृत्यू: १३ डिसेंबर १९७९ पुणे ), हे संगमनेर-अकोले परिसरातील श्रमिक, कष्टकरी, आदिवासी, विडी कामगारांचे नेते होते. ते प्रजा समाजवादी पक्षाचे नेते होते, त्यांनी परिसरातील मजूर, कामगार, कष्टकरी, महिला यांच्यासाठी कार्य केले. त्यांना कामगार आदिवासी साथी म्हनत. ते अहिल्यानगर जिल्ह्यात दुर्वे नाना या नावाने ओळखले जात होते. त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे साने गुरुजी म्हणत. ते व्यवसायाने वकील होते. वकिली करतानाच राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या जीवनावर साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी ताम्रपट (१९९४) ही कादंबरी लिहिली आहे. याच कादंबरीस नंतर साहित्य अकादमी पुरस्काराणे गौरविन्यात आले,

गोवा मुक्ति आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाववाढ विरोधी आंदोलन, आदिवासी जमिनी अतिक्रमण मुक्ति लढा अशा अनेक लढ्यात ते अग्रभागी होते. साने गुरुजींचे शिष्य आणि बाबा आमटे यांच्या 'रचनात्मक संघर्ष' या कल्पनेचे ते क्रियाशील पुरस्कर्ते होते.

त्यांच्या नावाने साथी भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले असून राष्ट्र सेवा दलाचे माज़ी महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक या ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आहेत,

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →