श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी मे २०२१ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने शेर-ए-बांगला क्रिकेट मैदानावर झाले. दिमुथ करुणारत्नेच्या ऐवजी दौऱ्याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कुशल परेराकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली.
बांगलादेशने पहिला एकदिवसीय सामना ३३ धावांनी जिंकला. तर दुसरा सामन्यातही पावसाचा व्यत्यत आला तरीही डकवर्थ-लुईस पद्धत वापरून बांगलादेशने १०३ धावांनी जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. श्रीलंकेने तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना ९७ धावांजी जिंकला. एकदिवसीय मालिका बांगलादेश ने २-१ ने जिंकली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?