श्रीपाल सबनीस

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

श्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच. डी. आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून निवृत्ती घेतल्यावर व कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून रिटायर झाले.

सबनीस यांचे ७७ हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल ५०८ हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१६-२०१९) झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात हजाराहून अधिक व्याख्याने झाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →