श्रीकांत नारायण (जन्म : १७ जानेवारी, इ.स. १९६८) हे एक मराठी गायक आणि रंगमंच कलाकार आहेत. त्यांची मराठी, हिंदी, तामिळ. तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत गायलेली एक हजाराहून अधिक नेक गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत.
मुंबईतल्या अंधेरीमधील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना श्रीकांत नारायण यांनी १९८५-८६ साली एका संगीत स्पर्धॆत विजय मिळाला आणि त्यांची संगीतातली कारकीर्द सुरू झाली. १९९० साली पदवी मिळाल्यानंतर ते मे अँड बेकर या औ़षध निर्मिती कंपनीत नोकरी करू लागले. १९९७ साली त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्यांनी संगीतासाठी पूर्ण वेळ देऊन संगीतातच कारकीर्द करायचे ठरवले.
श्रीकांत नारायण यांनी कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड, शंकर महादेवन आणि सुदेश भोसले यांच्यासारख्या गायकांबरोबर अनेक रंगमंचीय कार्यक्रम केले. 'रफी की रुहानियात' हाही त्यांचाच एक कार्यक्रम आहे. श्रीकांत नारायण यांचा घनगंभीर दर्जेदार आवाजामुळे ते 'रफीचा आवाज' म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची संख्या ८००हून अधिक झली आहे.
श्रीकांत नारायण
यामागील विज्ञान आणि इतिहास.