पुष्पा पागधरे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पुष्पा चंद्रकांत पागधरे (माहेरच्या पुष्पा चामरे) या एक मराठी गायिका आहेत.

त्यांचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील सातपाटी असून त्यांच्या वडलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांना गाण्याचे सुरुवातीचे शिक्षण शाळेतील आर. डी. बेंद्रे या शिक्षकांकडून विनाशुल्क मिळाले. पागधरे यांच्या कोळी समाजातील मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे सोपे नव्हते. पुष्पाताईंच्या वडलांचे मनोर, वाडा येथे भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पा वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →