आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २३नोव्हेंबर १९४८रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थक नृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत जा' हे, आणि पहिला चित्रपट 'तांबडी माती'. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली.
समाजप्रबोधनात्मक माहितीपट, लघुपट आणि मराठी चित्रपट निर्माते माधव पांडुरंग नाईक (निधन सप्टेंबर २०१३) हे आशा काळे यांचे पती होत.
२००८साली गोव्यात झालेल्या ६व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा काळे यांच्या हस्ते झाले होते.
आशा काळे
या विषयातील रहस्ये उलगडा.