शेषराव माधवराव मोहिते (१ ऑगस्ट, १९५६:व्हंताळ, उमरगा तालुका, उस्मानाबाद जिल्हा - ) हे ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि शिक्षण व्हंताळ, बलसूर, परभणी येथे झाले.
कृषी विस्तार या विषयासाठी डॉ.जी.जी.नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. ही पदवी मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे १९८८ मध्ये पूर्ण केली. विद्यार्थिदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे संयोजक म्हणून (१९८० - ८१) जबाबदारी सांभाळली. १९८० पासून शेतकरी चळवळीत सक्रीय. शेतकरी चळवळ, जेम्स हेरियेट, अलेक्स हॅले, मुन्शी प्रेमचंद्र, ल्युओ टॉलस्टॉय, मॅग्झीन गॉर्की, साने गुरुजी, जी.ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके, दया पवार यांच्या साहित्याच्या वाचनातून वाड्.मयीन जडणघडण झाली. विद्यार्थी दशेत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सिनियर रिसर्च फेलो म्हणून १९८५ – ८६ याकाळात काम केले. १९८६ पासून राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे पीकशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून काम केले.
शेषराव मोहिते
या विषयावर तज्ञ बना.