शेवगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे ऊस ,कपाशी या पिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यांतील शहरांतून मुख्य शहरी मार्ग जात असून व्यापार व आधुनिकीकरण वाढत आहे. तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेची गावे बोधेगाव आणि चापडगाव आहेत.
शेवगावपासून ७ कि.मी.अंतरावर शनेश्वर देवस्थान आहे. दर वर्षी शनिजयंतीला येथे मोठी यात्रा भरते. प्रत्येक शनिवारी अभिषेक व पूजा होत असते.
शेवगाव तालुक्यातील खरडगावी शैक्षणिक सुविधा तसेच बॅकेची सुविधा आहे. गावाच्या दक्षिणेला नानी नदी वहाते. शेवगावला काही काळापूर्वी "शिवग्राम" म्हणू ओळखले जाई, कारण तेथे महादेवाची ५ भव्य शिवमंदिरे आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शेवगावची लोकसंख्या ३८३७५ आहे.तालुक्यात चापडगाव हे ऐतिहासिक गाव आहे,चक्रधर स्वामींनी चापडगाव येथे "काटपाडी" नदीच्या काठी महादेवाच्या मंदिरात दोन दिवस मुक्काम केला असल्याचा महानुभाव पंथाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो,चरपट या शब्दाचा अपभ्रंश होऊनच गावाचे नाव चापडगाव पडले.चापडगाव मोठे बाजारपेठेचे गाव असुन,गावातुन राज्य महामार्ग गेलेला आहे.
शेवगाव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!