हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.
हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी.२ आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान आहे. येथे पौष पौर्णिमेला यात्रा सुरू होते. खुप ठिकणांवरून येथे भाविक येतात. कुरुंदा गावाजवळील टोकाई माता मंदिर,आंबा येथील अंबादेवी मंदिर, करंजाळा गावातील सीमा भागात बाराशिव येथील हनुमान मंदिर व जुनी बाराव आहे यात पंचमुखी महादेव अर्ध मुर्ती आहे मिती माघ शुक्ल पौर्णिमेला यात्रा भरते येते बारा गावांच्या शिव एकत्रित येतात व औंढा नागनाथ व वसमत सीमेवरील मंदिर आहे, बोराळा येथील हनुमान मंदिर व चोंडी बहिरोबा येथील बहीरोबा देवस्थान इ.
वारंगा (मसाई) हे गाव हिंगोली पासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. आणि तालुका कळमनुरी पासून १० किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव मसाई माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावांमध्ये पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी एक मोठी यात्रा भरते. हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी घेरलेले आहे.
वारंगा मसाई गावातील मंदिरे:
मसाई देवी मंदिर, हनुमान मंदिर, संत सावता माळी मंदिर, डागेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर.
हिंगोली जिल्हा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.