मंगरुळपीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने मुस्लिम व हिंदू आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर "मंगरुळनाथ" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंगरुळपीर तालुका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.