परभणी जिल्हा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

परभणी जिल्हा

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत.परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले साई बाबा संत जनाबाई तसेच इतर यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.

परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.

परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी), संत जनाबाई गंगाखेड व संत भोजलिंग काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी नृसिंह राजारामपंत कुळकर्णी उर्फ राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.

त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे.त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.

पुर्णा तालुक्यातील कातनेश्वर या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.

परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.

मनपा १

प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना

महत्त्वाचे पीक :- ज्वारी

समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.

खेडे:- 830

पिन कोड:-

१) परभणी -431401

२) सेलू:- 431503

३) मानवत:- 431504

४) पाथरी:-431506

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →