परभणी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

परभणी

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्थानक हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात. प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे. परभणी शहराला प्रभावतीनगरी हे नाव प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते. प्रभावती या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती आणि लक्ष्मी असा होतो. परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरूप आहे.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.

परभणी शहरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पारधेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला पारद शिवलिंग असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.

श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे.

या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →