गंगाखेड तालुका

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या गावात गोदावरी नदीच्या काठावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. प्राचीन इतिहास असलेल्या या गावात अनेक जुन्या घरांचे राजवाड्यांचे अवशेष सापडतात. गोदावरी नदीकडील परिसरातील अनेक घरांचे बांधकामे ही जुन्या पद्धतीची आणि दगडांनी बनलेली आहेत. जस जसा गंगाखेडचा विस्तार होत गेला. तस तशा या गावात अनेक नवनवीन पद्धतीची बांधकामे होण्यास सुरुवात झाली आणि नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →