मंदिर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मंदिर

मंदिर हा शब्द बहुतांश वेळा हिंदू किंवा जैन धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी वापरला जातो.

परंतु काही वेळेस (धार्मिक अर्थ वगळता) जेथे त्या वास्तूचे पावित्र्य किंवा मोठेपण दाखवायचे असते अश्या इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरला जातो. उदा. आरोग्य मंदिर, योग मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर.

मंदिर हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असेही म्हणले जाते.

भारतातील ज्योतिर्लिंगे, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, कोणार्क सूर्य मंदिर, काशी विश्वनाथ, इत्यादी ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील सिद्धिविनायक, शिरडीचे साईबाबा मंदिर, अकरा मारुती मंदिरे, अष्टविनायक मंदिरे, परशुराम मंदिर,लोणादित्य मंदिर आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.

तीर्थक्षेत्रे, इष्ट देवतांची मंदिरे ही अशी ठिकाणे आहेत जिथे काही संत राहत असत. तेथे साधना करून आणि भक्तीची संपत्ती गोळा करून ते आपले शरीर सोडून त्यांच्या इष्ट देवतेच्या लोकात जातात.त्यानंतर त्यांच्या उपस्थितीचे पुरावे जपण्यासाठी कोणीतरी तिथे एक मंदिर बांधले, जेणेकरून त्यांची स्मृती कायम राहील आणि लोक पुरावे पाहण्यासाठी तिथे जातील. म्हणूनच २१व्या शतकातील लोकांसाठी मंदिरे आणि तीर्थयात्रेला जाणे हा एक संवेदनशील विषय आहे कारण त्यांना त्या कार्याचा फायदा दिसत नाही. सामवेदातील एक श्लोक स्पष्ट करतो,

सामवेद क्रमांक क्र. १४०० उत्तरचिक प्रकरण क्र. १२ विभाग क्र. ३ श्लोक क्र. ५,



भद्रा वस्त्रा समन्या3वसानो महान् कविर्नविचनानि शंसन्।

आ वचस्व चम्वोः पूयमानो विचक्षणो जागविर्देवितौ।।५।।

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →