बुलढाणा जिल्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे. विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, अमरावती, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस मध्य प्रदेशचा निमाड प्रांत आहे.



जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.

कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →