शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Международный аэропорт Шереме́тьево) (आहसंवि: SVO, आप्रविको: UUEE) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी शेरेमेत्येवो एक आहे. दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या २९ किमी वायव्येस स्थित असलेला शेरेमेत्येवो विमानतळ ११ ऑगस्ट १९५९ रोजी बांधला गेला. एरोफ्लोत ह्या रशियामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा हब येथेच आहे. शेरेमेत्येवोमध्ये २ धावपट्ट्या व ६ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.