मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Internacional Ministro Pistarini) (आहसंवि: EZE, आप्रविको: SAEZ) हा आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. बुएनोस आइरेस महानगरामधील एझीझा उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार, विमानांच्या उड्डाणसंख्येनुसार तसेच मालवाहतूकीनुसार आर्जेन्टिनामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. आर्जेन्टिनाचा माजी लष्करी अधिकारी व २१वा उपराष्ट्राध्यक्ष हुआन पिस्तारिनी ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे.

येथून लॅटिन अमेरिकेमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी तसेच उत्तर अमेरिका व [युरोप]]मधील काही शहरांसाठी थेट प्रवासी सेवा पुरवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →