शुभांगी गोखले

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शुभांगी गोखले

शुभांगी मोहन गोखले (जन्म : खामगाव, २ जून, १९६८) यांचे विवाहापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई असे आहे. मराठी लेखिका, महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. शुभांगी गोखले या प्रख्यात अभिनेते कै.मोहन गोखले यांच्या पत्‍नी आणि टी.व्ही./चित्रपट अभिनेत्री सखी गोखले यांच्या माता आहेत. संजय संगवई व रवींद्र संगवई हे त्यांचे मोठे बंधू. रवींद्र व्यंकटेश संगवई हे मराठी, हिंदी चित्रपटांत काम करणारे चरित्र अभिनेता असून ते रिझर्व बँक ऑफ इंडियात अधिकारी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →