श्रीयुत गंगाधर टिपरे

या विषयातील रहस्ये उलगडा.

श्रीयुत गंगाधर टिपरे ही झी मराठी वाहिनीवरून इ.स. २००१-२००५ या काळात प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. ०२ नोव्हेंबर २००१ पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली. १६५ भागांनंतर ०७ जानेवारी २००५ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली. केदार शिंदे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक, इत्यादी कलाकारांनी या मालिकेत भूमिका केल्या आहेत. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे झी मराठी वर याचे दोनदा पुनःप्रक्षेपण करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →