दिलीप प्रभावळकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दिलीप प्रभावळकर

दिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. दशावतार 2025 या मराठी चित्रपटामध्ये 'बाबूली मेस्त्री' यांची प्रमुख भूमिका साकारली. झपाटलेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि चौकट राजा आणि एक डाव भुताचा या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी 'आबा गंगाधर टिपरे ' म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या 'चिमणीव' मराठी रंगभूमीवरील, 'हसवा फसवी' आणि 'वासूची सासू' मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या. प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →