राजहंस प्रकाशन

या विषयावर तज्ञ बना.

राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग. माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.

मोठे पुस्तकप्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडलेले आहे. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय पुण्याच्या सदाशिव पेठेत आहे, पण त्यांची विस्तार कार्यालये महाराष्ट्रभर पसरली आहेत. विक्रीचे असे भक्कम जाळे उभे करताना पुस्तकांचा दर्जा टिकवण्याकडेही संस्थेचा कल आहे. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळाले आहेत, त्यांपैकी शंभराहून अधिक पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून मिळालेले आहेत..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →